राक्षेस तागडीचा रणसंग्राम
The Rakshas-Tangadi Bakhar is written in contemporary Marathi. It is likely an eyewitness account of the battle of Rakshas-Tangadi/Tallikotta from 1565CE. There are some errors, such as confusing the armies of Adilshah at times for the Mughal emperor Akbar. This could be because the Vijaynagara forces seem to have believed the Adil Shah's neutrality for long. Otherwise, it follows the Persian accounts very closely and corroborates much of it.
Each sentence is followed by its translation. The sentences are often very long, with multiple verbs and actions. These may be split into two or more sentences to make it more readable.
रात्री राजभुवरा(ने) स्वप्न देखीले जे आपुले कानीचे मोती तोडून घेत होते बैसले सिहासन हिरोन घेत असे आपणासी दूत येऊनु वोढीत असे असे पाहुनु घाबीरा होऊन ऊठीला सवेची थोर थोर जोइसी व पंडीत व वेदशास्त्री व ग्रामजोसी आपुले वडीलाचे वेले आदीखानी बहुता दिवसाचे होते त्यासी बोलाऊ पाठविले.
At night, the king had a dream, in which the pearls in his ear were shattered, and his throne was lost. With trepidation, he awoke and sent for the astrologers and pandits. (to consult about the omen).
मग त्यापुढे स्वप्न सांगीतलेवरी त्यांनी राज भुवराची मन समाधान केले जे तुझे शत्रु जे कोण्ही येताती ते नास होऊ(न) जातील तुवा क्षेत्रपती मार्केडी (आ) उश होऊनु राजसिहासनी रा(ज्य) करीसील म्हणोन बोलिले मग आप(ण) आले लोकासी असावलिया व करनाटकी चादरा देऊनु दोहडावले.
After hearing about the dream, they pacified the monarch by suggesting that it implied the destruction of his enemies.
मग राजयाने बैसोन पांच हजार होनु ब्रामणासी वाटिले.
The king donated 5000 hons (currency) to brahmins. (priests).
मग राजयाने बरवे मोहूर्त पाहुनु घोडा सारंगा अमृतनिधान राजाबैसता आणऊन त्यावरी बसोन अकरावे तासी तख्त विज्यानगरा होऊनु बाहीर येऊन उतरतर्फेसी नवगोजी देऊनु उतरीले पागा व पीलखाना व उस्तरखाना व थुद्री व सिकारखाना व जमदारखाना व शरबतखाना व कोठी व फराशखाना व अंबारखाना व तमाम येऊनु नऊगजी आसपास येऊनु उतरीले शाद्दार विजयानगरामधें धांडोरा फिरविलें कीं येक घोडा व राऊत न राहाता लस्केरासी चालणें म्हणोनु ताकीद केली. तमाम बाहेर येऊनु उतरीले.
Then the king, at an auspicious time (muhurat), seated himself on the royal throne, and then gathered all the divisions of his army- the cavalry, the elephants. Not a horse or common trooper was left idle. (Everyone was to march along.)
या खेरीज मनेवरानी व पुंडानी पालेगारानी व लिंगारीयानी व अलकु रानी व राजबिडीयानी व हिबलकारानी मोबलग गणती सापडीत नाहीं जंगलोजंगल व डोंगरेडोंगर व दरेखोरे जागा जागा उतरले असे नजरेने पाहतां करनाटकी लसकेर सांत आ (ठ) गांव जमीन उतरले असे राज भुवराने नडगोजी तुंगभद्रातून पुढे दिधले.
In addition to these forces, the polygars, lingariya(?), Alku queen, rajbidas (king's elite guards) , Hibalkars(?), and the warlords of the forests, had all contributed troops. With all these, he crossed the Tungabhadra.
पेषखाना जाऊनु क्रुष्णानदी कडका घरून उतरले राजयानें इत्तीस आणऊनु पाहुन सीले करवीले . हतीचे नावें पिनावे बीता * ...... तमाम इत्ती सीले संदुती करून हत्तीवरी जंबुरे जबरजंग लाऊन अला हिदा पेशनामाजाद क्रुष्णा नदी तटाकी उतरवीले राजभुवरानें का तावरगीरी व कुंदरा पिवयेल बरगे दरमायाने येऊनु नडगजी देऊनु उतरले.
Peshkhana (Advance units and tents) moved towards Krishna river. These were later augmented by armored Elephant corps with small cannons. The King started from Vijaynagar and moved via Tawargeri (approx 71km) and Kandagal (most likely village as per map) and camped near Krishna river.
(credit to @seekersaurabh1 for this passage.)
पेशनामजादी लस्केर व बाजारबुणगा येऊनु मुसकीनजीक उतरीले नीजामशाहा पादशाहा बहीरी मन्हाटा तख्त दौलताबाद याने भीमरथीस येऊन उतरोन सुलतान पेरोजाबाद नजीक उतरला व अकबरजलालदीन पादशाहा शहादुर्गानजीक उतरला व इमराइम कुतुबशाहा तेलगण तख्त गोलकोंडें याने मुदगल व रायेचूर दरम्याने उतरला.
The enemy army and camp arrived near Muski(?). The Nizamshah patshah from Daulatabad crossed the Bhima near Ferozabad, and Akbar Jalaluddin Patshah (this name is incorrect, there was no Mughal involvement, it should have been the Adilshah) , camped near Shahdurg and Ibrahim Qutubshah from the Telangana region with capital at Golconda, camped between Raichur and Mudgal.
चद्दुतर्फेने मुसलमान पादशाहायानी लस्कर व लुटावरे व पेढारे व वणजारे व चोरपाईक नदी धरून उतरले. राजभुवराचे मुलुकामधे चिधीचोली बं ( हा ) द धरून आणु लागले.
From all directions, the joint force of the sultans began crossing the river. From the king's lands, they began raiding and carrying off spoils.
तमाम मुलुक हुली होऊन चालीले राजभुवरानें आपले लस्करासी ताकीद करून बाजारबुणगा नजीक च्यार हजार घोडा व पावप्यादे पनास हजार ठेऊनु तमाम वजीराने व राजबिडीयानी व राज कोमारानी व येकांगधीरानी व सपरीगारानी व रजपुतानी व क्षेत्रीयानी व दलवीयानी व मनेवारानी हे अवघे जाऊनु राक्षेसतागडीस जाऊन नजीक उतरले.
Then the king left 4000 cavalry and 50 thousand infantry at the rear with the camp, and taking with him the wazir (prime minister), and the crown prince, and everyone else, they halted near Rakshas-Tangdi.
अराबा, भांडी, फिरंगी गाडीयावरी मुस्तेदी करून जोडुनु बाण तमाम पावसुर बाणाईत बैलावरी दर बैलासी बाण सुमार २८ * येकुन बाण सुमार ८००००.
Cannons on carts, large immobile cannons, rockets on carts, and rockets on bullocks, approximately 28 rockets per bullock, in total 80,000.
व राजबाण व कोमारबाण यैसे उटावरी अराब पुढें उतरवीणे व बारु गेलोले व तुव खिजतना इ ने सांगाते घोडा राऊत व पावपाद्ये असपास दरम्याने ठेवणे व बिसलया नाईक त्रिवेंगलपा नाईक व कार्तीकविरपा नाईक हे तीघेजणासी राजभुवरी कपडे देउनु मुसलमान पादशाहीसी झगडा करावे पेस(यास) नामजादी पाठविलेवरी त्यानी येउनु आपुले करनाटकी कुल लस्केर देखील राक्षेसतागडीनजीक उतरीले हे खबरी जासुदानी व कालबा (दा?).
And king rockets, and prince-rockets ( various types of large rockets?) on camels, and cannons were deployed in the front. The cavalry and infantry was kept close behind it. Bislaya Naik, Trivengalpa Nayak and Kartikvirappa Naik were gives robes of honour and ordered into battle. They gathered their Karnataki (from Karnataka) army and descended to give battle - such was reported by the spies.
रानी व हरकारेयानी येसे जरजरा तिलतिल खबर घेउनु आपुले पादशाहासी सांगितले मग मुसलमान पादशाही गांव पांच कोसावरी येउनु उतरले. वरी निजामशाहा महाठा पादशाही व ईभराईम कुतुबशहा तेलंगण पातशाही हे दोघेजण फुटोन अलाहिदा लस्केर येउनु तलावा फिरो लागले ते पाहोन राजभुवरानें लस्कर पायदल फौज करून भार रचिले.
When the patshahs were informed, then the patshahs marched to villages within 5kos. Nizamshah and Ibrahim Kutubshah, these two split from Ali Adil Shah and began deploying at the lake( across the river?). Seeing this, the king ordered his infantry and cavalry to form up.
अलीयेदलशाहा पादशाहा कन्नडजाण याने आपुले कुल लस्केर घेउनु येक फौज करून उभा राहिला. इमामनमुळीक पादशाहा वराड देश आपुले कुल लस्केर घेऊनु येकभार रचिले असे तीनी च्यारी पादशाहा च्यारोतर्फ भार करून राहिलेवरी करनाटकी पाऊप्याघे व घोडेस्वारानी येकदुमाल होउनु अरोबा मधे रचून पुढे चालुनू निजामशाहा बहीरी पादशाहा व कुतुबशाहा तेलगणे तर्फे झगडा केले.
Ali Adil Shah patshah from Kannada lands, made one large combined force of his army and stood for battle. Imam-ul-mulk patshah from Varhad (Berar) country also assembled, in this fashion, 3-4 patshahs in all directions stood their ground. Then the Karnataki infantry, cavalry, keeping the cannons in the center, attacked the divisions of the Nizamshah and Qutubshah.
बाणाबाणी जहाले व त्यामधे व यामधे लस्केर बहुत जाया जाला दोहीतर्फेचें लस्केर जखमी बार जहाले. निजामशाहा बहिरी पादशाहा व कुतुबशाहा तैलगण याने दीडकोस माघारे जाऊनु अलीयेदलशाहा कन्नडजाण व ईमामनमुळीक वराडदेश पादशाहा याने आपले जागा मुस्तैद दोनी फौजा होते त्यानी येउनु झगडा दिल्हे जखमी व पाडाऊ जाहाले वीतपसील.
Lots of rocket fire was exchanged from both sides in which many men died and got wounded. The Nizamshah and Qutubshah were pushed back by 1.5 kos. Ali Adilshah and Imam-ul-mulk with their two armies then arrived to support them. Heavy fighting happened in which many men died.
हे रणजखमी व पाडाऊ जाहालेवरी राजभुवराने अकोन अपुले तरफेचे वजीरास व लोकासी व बाजे खलकासी कपडे पाठविले.
When the king heard of the casualties, he sent robes of honour to the frontline. (To encourage the troops).
आपुले लोकासी सागोन पाठवीले जे अपण येईजे तो झगडा न करणे लोक बहुत जाया होतांती.
He sent messengers with new orders not to attack but fight only if approached, to minimize casualties.
तमाम जमा जाहालीयावरी शर्तमर्दीने झगडा केला जाईल यैसे भोसल्या दलवीयासी पाठउनु दिल्हे.
When the enemy is gathered in force, only then fight hard, with such a message, he dispatched Bhonsle and Dalvi. (2 Maratha sardars?)
अलीयेदलशाहा पादशाहा कनडजाण या पासी छरीयेपा नाईक जामदार याला हेजीबातीस पाठविले.
Chariyappa Naik jamdar (an officer) was sent to Ali Adil Shah.
जे तुवां अपण चालोन येउनु अम्हापासी येउनु मांडीवरी बैसून फर्जद म्हणवले कि तुम्हा कडे अपण न येऊ म्हणोन येसे शर्तनामा केलेवरी रायेचूर व अदवानी हे दुदलोणी बद्दल दिल्हे. आपुले सद्वेमधे पादशाही जमजम करुनु असावे यैसे असंता तुम्ही अपुले मुळुकामधून तिघ पादशाचे लस्केरासी वाट देउनु अपण कुल लस्केरसहीत येउनु, मदती होउनु उतरले असे बहुत बरे चार पादेशाही मिळुन आलीया काय होणार असे पेस्तर तुमचे मुदा काय कैसे असें ?
(Message follows) When you came to us, we offered you refuge. For good ties, we granted you Raichur and Adoni. Despite intention of permanent good relations, you have gathered all your army, and marched with these patshahs against me. Does this suit your honour?
म्हणोन मग अलीयेदलशहा याने जबाब दिल्हे जे तिघे पादशाही लस्केर जोरावार होउनु माझे मुळुकामधून आले. मज पासी जोरावार नाही. कुल लस्कर व मुळुक खराब केले. हे राजवटे मधे आम्ही पडलो नाहीं हे तो जैसे फर्जेद म्हणोन मांडीवरी बैसोन सव सफघ दिल्हे असे त्यासी खता नाहीं तुम्ही काही दिलगीर न होणे.
The Adilshah replied- "The three patshahs along with their armies, marched into my provinces. My forces were insufficient. They ruined my lands. I have not entered this alliance of my own accord. But I was forced by circumstances. Do not think ill of me."
यैसे हेजीबा सांगाते खलबत करुनु हेजीबासी शाल व आसावली व तेजी व हस्तकडग व कुडकीयासी मोती जोडा १ दिल्हे व हत्ती छावा येक १ दिल्हे व हेजीबा सांगाते मोख्त सर दाहजण आले होते त्यासी शाला येक येक देउनु हेजिबासी पाने देउनु दोहडावीलेवरी हेजीब जाउनु राजभुवरासी हे हककती बयाण अर्ज केले.
This was conveyed to the messenger, and he was honoured with pearls, an elephant and other items.
हेजीब सांगाते आलीयेदळशहाचे हरकारे सीवाजी गोपीनाथ जमारीकादा होता त्या सांगाते तीन तास पासुनु पांच तास परीयंतर खलबत करुनु हरकारा मशारनुलेसी येक दुस्त कपडे दिल्हे व मोतीयाचा तुहाइ येक १ व कमरशाल १ दिल्हे.
After discussing for 3 to 5 hours, Ali Adil Shah's messenger Shivaji Gopinath was rewarded with rich cloth and pearls.
बहुत मेहमानी केली. अलीयेदलशाहासी फिरंग व कमर गुर्दा थोर मोलाचा देउनु पाठविले. हे खबर निजानशाहा बहीरी व कुतुबशाहा तेलगण व अकबर जलालदीन मोगली पादशाहा यासी दिदवानी हरकारे यानी लिहून पाठविले जे अलीयेदल शाहा सांगाते राजवटा लावीली असे म्हणोन मग तिघे पादशाहा यानी येदलशाहापादशाहा नजीक हरकारेसी पाठविले.
The envoy was treated with great honour. Foreign items of great value were awarded for Ali Adil Shah. When Nizamshah and Qutubshah, and Akbar Jalaluddin got word of this, they sent messengers to Ali Adil Shah.
अम्ही अवघे मिळोन राजभुवराचे मुलुकगीरी कराव्या आलो असो दरम्याने तुम्ही त्या सागाते राजवटा करीता हे तरी बरे नव्हे अवघे येकवट होउनु गोशमाल देणे लागते अलाहिदा राजवटा केलीयाने काम होऊन येत नाही तरी तुम्ही त्यामधे भिलालीया आम्ही काही फिरोन जाणार नाही. शर्तमर्दीने मुलुकगीरी करून तुम्ही आम्हा बराबरी मसलतीस येणे, म्हणोन तरी येदलशहाने सांगोन पाठविले की तुम्हाबरोबरी असो जे काये दिलचे मुदा असेल ते कबुल. म्हणोनु मग हरकारेसी तश्रीफ देउनु रवाना केले राजभुवराने आपण येऊन राक्षेसतागडी नजीक उतरले.
"We have come together to march on the king (of Vijaynagara). At the same time, you are opening negotiations. We will not retreat. You must keep your word and fight with honour. Whatever you ask, we will grant." Then he took to the field at Rakshas Tangdi.
रणथाबा चौघार राक्षेसतागडीचे मैदानामधे घातले करनाटकी लस्केर तमाम येउनु उतरले झगडेसी सुरु जाहाले.
The Karnataki army took to the field again for battle.
मुदती रोज २७ झगडा जहाला जलालदीन अकबर पादशाहा तख्त जालनापूर याने मोगल व कर्ण रजपूत राहाठोड हे नालतवाडी दरम्याने उतरले.
Karna Rajputs, Rathores took to the field at Nalatvadi to help Akbar patshah.
(This is an obvious error, there were no Rajputs or Mughals involved in this battle. Who were they confused with? the Adilshahi forces?)
यामधे व त्यामधे रायबागा नजीक झगडा रोजबरोज होऊं लागला. करनाटकी वजीर व यैनलमुलुक व अंकुशखान बारगीर वजीरानी पारखे होउनु येदलशाहा तर्फेसी आले.
At Raibagh, fighting used to take place everyday. The Karnataki wazir, Ain-ul-mulk, and Ankush Khan bargir were estranged from the wazir and left and joined Ali Adil Shah. ( The wazir cannot be estranged from himself, the start of the sentence may be misprint. These two sardars seem to have left Vijaynagara and joined the Adilshah.)
जलालदीन अकबर पादशाहा व निज्यामशाहा पादशाहा बहीरी व कुतुबशाहा तेलंगण हे तिघे मिळुनु राज फौज करून चालोन आले.
Jalal-ud-din patshah Akbar, Nizamshah patshah, Qutubshah combined their forces and advanced to attack.
राजबिडे पाऊपाये हसम झगडा दिल्हे पहिले तास पासून अकरा तास पावेतों झगडा जहाला.
The rajbidas (the king's elite guard) and the infantry fought from the first hour (of the day) for 11 hours.
रण दुतर्फे पाडले. राजभुवरानें राज चिडे व बाजे वजीरासी व लोकासी बोलाऊन खलबत केले. सदरहू वजीर अवघे मिळून राजभुवरास अर्ज केले -
जे मुसलमानु पादशाही लस्केर येकवट होउनु येताती आम्ही त्याचे तोंडेसी उभे रहातो. जैसे मारावे तैसे झगडा फत्ते करीतो. अलीयेदलशाहा व इमामनमुळीक हे दोघे पादशाही लस्कर आपुले जागा होऊन पुढे येताती, दोघे पादशाही झगडा देत असे रोजबरोज रण पडीत. असे ह्यानी दगा देउनु सांपडवीतील ह्याचे पतेरा नाहीं ते तर्फेसी मुदाम दाहा हजार घोडा व पन्नास हजार पायेदळ त्याचे तोंडेसी राखणे. आम्ही दिलपाखीनें मशाकत करून दोन्ही पादशाही लस्कर दगा देतील.
Scores of men lay on the field on both sides. The king was angry, and summoned the wazir and others for a council. The wazir and others recommended to the king- "the patshahs who attack, we hold firm. Our soldiers win the fighting on the day. Ali Adil Shah and Imam-ul-mulk, these two patshahs when they advance from their prepared positions, every day we push them back with heavy casualties. 50 thousand infantry, and 10 thousand cavalry must be kept in reserves to face them. By our efforts, both patshahs (their armies) will give way.
यैसे सिर भोई ठेऊन रोशन केलेवरी राजभुवरानें वजीरासी कपडे देऊन दोहडाविले जागा जागा आपुले गड कोटासी इतबारी लोकासी राजभुवराने पाठविले चीतपशलि. येणेप्रमाणे कपडे देउनु पाठविले.
After this, the king honoured the wazir with robes of honour. The commanders of the forts, and other offices were also rewarded similarly.
राजफौज झगडा जहाले. निज्यामशाहा बहिरी व कुतुबशाहा तेलंगण मोडा जहाला. अकबर जलालदीन मोगलावरी झगडा घातला. त्याचे मदतीस कोण्ही आले नाहीं. निज्यामशाहा बहिरी व कुतुबशाहा तेलंगण हे मोड जहाले. मोड होउनु येकजागा भार रचिले होते.
Fighting continued. Nizamshah and Qutubshah's forces were broken. Akbar Jalaluddin continued to fight but no one came to his aid. Nizamshah and Qutubshah were forced to retreat. In their retreat, they moved back, combined their forces and made a stand.
लस्कर करनाटकी झगडा करुनु परतुन येता, मागुती हे फौज लस्कर झगडा दिल्हे हे करनाटकी लोकानी ४,०००,०००. हजार बाण येकायेकी ब(हा?)त्ती लाविले.
Before the Karnataki army returned, they fired 4,000,000 thousand rockets at the enemy. (The zeros seem to be errors. The text says thousand, so this is likely 4,000 rockets, not 4 million.)
त्याखाली दोघे पादशाहाचे लस्कर मोबलग झगडीयात पडीले कच खाऊन आपुले जागेसी उतरले. मोगली लोक मागुती येउनु अलाहिदा झगडा दिल्हे.
Both patshah's forces were slain in large numbers and returned to their camps. The Mughal forces then engaged in battle.
करणाटकी लोक बहुत पडीले. इतुके झगडा देउनु राजभुवराचे लस्केर जाउनु आपुले जागा उतरले. राजभुवराने आपण राजहौश मुस्तेदी रामहत्तीवरी बैसोन, कुल लस्कर दोघे तिघे पादशाहावरी चालिले.
Many Karnataki men were slain. After the fighting, they returned to the center where the king was. The king seated himself on this royal throne and advanced on the two or three patshahs.
भांडे थोर थोर भरुनु भांडेचे बहुत मार जहाले. बहुत कच होउनु लस्कर मोड जाहाले. त्यावरी राजभुवराने बहुत खुषीहाल होऊन नडगोजीस परतून येउनु उतरले. करनाटक लोक तिनी पादशाहा लस्करासी झगडा करून भागोन बेहुशार होऊन, लस्केर उतरले होते.
Large cannons were filled and unleashed heavy fire. (with coins? भरुनु typically refers to filling something up rather than loading with a cannonball. This corrborates other accounts which describe loading enormous cannons with coins/stones for use as grapeshot.). Despite their deep advance, (our) army was routed. The king gave orders to retreat, and dismounted. The Karnataki army, having fought with 3 patshahs, began to flee.
अलीयेदशाहा व इमामनमुलीक वराडदेश पादशाहा हे दोघेजण पादशाहा येकायेकी मुस्तेदीहून राजभुवरावरी घोडे केला.
Ali Adilshah and Imam-ul-mulk together combined and ordered a cavalry charge.
त्याचे जिना उतरुन बेखबर होते. पाऊप्याद्ये लोक रोटीपोळी करून घेत होते. तो येही जाऊन सभा पडोन खतर केले.
The king was unaware of his surroundings, having descended from his throne. The infantry was fleeing. He was captured by the enemy.
राजभुवर रामराज अलीयेदलशाहा पादशाहा कन्नडजाण हाताखाले पाडून जाब बोलिला-
जे तुवा माझे लेक म्हणोन बोलीली होतासी तुवा येकायेकी दगा करुनु मजवरी सभा पडिलासी. आता माझे काये ततबीर चालणार?
The king said to Ali Adilshah after his capture "Even when I called you my son, you have engaged in treachery and attacked me. Now what shall I do?"
असे माझे लस्केर तमाम पडीले म्हणोन ताजा कपडे पुरतकालीक दाईव टोपीस हिरा मोती माणीकाचे कुलाब घालून मावीशाला पांघरुन अपुले देवासी स्मरण करून अलीयेदलशाहासी सांगोन पाठविले- "जे तुवा आपण फिरंग घेऊन येकांग लढाई करावे. दुसरी याने आपुलीयावरी हात देऊ नये" म्हणौन त्यापासी सौगंद घेतले.
The king regained his composure, and sent a messenger to Ali Adil Shah to promise him "You must engage in battle with our forces with only your own, the other patshahs should not be involved".
मग अलीवेदल शाहाने अपण येकांगी भिडीतां नजीक उभे राहुन डोसकी कापिले हे खबर च्यारो पादशाहासी जाहीर जाहाले. करनाटकी लस्केर तमाम चिंदीचोल जहाले. पलोन हत्ती व घोडे उट बारु गलोले व बाण सुमार व खजाना तमाम लुटालुटी जहाले.
Then the Adilshah, after engaging in battle on his own, declared that he had captured and slain the (Vijaynagar) king. The Karnataki army then lost hope and began to retreat. In their retreat, the elephants, horses, camels, rockets, treasure was all plundered. (by the enemy).
कुल लस्कर मिलोन विज्यानगरासी गेले. राजभुवराचे माये व तिघीजण बाईला हे खबर ऐकोन माहालासी आगी लाऊन दिल्हे.
The army and the camp followers went to Vijaynagara. When the king's mother (?) and three wives were informed of the disaster, and the palace was set on fire.
माणीक मोती व हीरा रत्न(?)
pearls, diamonds and jewels ( were looted? carried away?)
तमाम मुसलमान लस्कर पादशाहा जाऊन कटकबंद उतरोन मुदाम १४ रोज शहरामधे सोदासोदी केले मोबलग माल सांपडिले मुलुकगिरी तिनी पादशाहा यानी केले.
Then the forces of the patshahs laid siege, and for 14 days sacked the city. They found immeasurable amount of treasure, and plundered it thoroughly.